Ad will apear here
Next
‘गीतबहार'ने जिंकली पुणेकरांची मने

पुणे : भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘गीतबहार’ या लोकप्रिय हिंदी-मराठी गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

शुभांगी मुळे प्रस्तुत हा कार्यक्रम १९ जुलै रोजी भारतीय विद्या भवनच्या सरदार महादेव बळवंत नातू सभागृहात झाला. भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी प्रास्ताविक केले. 

या कार्यक्रमात गण, गवळण, लावणी, लोकप्रिय हिंदी-मराठी गीत अशा एकाहून एक बहारदार रचना सादर करण्यात आल्या. ‘दही दूध लोणी’, ‘रात्र काळी’, ‘घागर काळी’सारख्या गवळणी, ‘झाला महार पंढरीनाथ’, ‘कानडा राजा पंढरीचा’, ‘वासुदेव’सारखी भक्तीगीते, ‘धुंदी कळ्यांना’, ‘घन ओथंबून येती’, ‘जीवलगा’सारखी भावगीते रसिकांना मोहवून गेली. ‘झुमका गिरा रे’, ‘कजरा मोहब्बतवाला’, ‘उडे जब’, ‘झुल्फे तेरी’ यांसारखी लोकप्रिय हिंदी गीतेही शुभांगी मुळे, हेमंत वाळुंजकर यांनी कार्यक्रमात सादर केली. त्यांना केदार परांजपे, जयंत साने, मोहन पारसनीस, हेमंत पोटफोडे यांनी साथसंगत केली. मीरा ठकार यांनी निवेदन केले. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AZLVCC
Similar Posts
भारतीय विद्या भवनमध्ये १९ जुलैला ‘गीतबहार’ कार्यक्रम पुणे : भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘गीतबहार’ या लोकप्रिय हिंदी-मराठी गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शुभांगी मुळे प्रस्तुत हा कार्यक्रम १९ जुलै २०१९ रोजी सायंकाळी सहा वाजता भारतीय विद्या भवनच्या सरदार महादेव बळवंत नातू सभागृहात होणार आहे
‘नृत्यसंध्या’ कार्यक्रमाला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद पुणे : भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत ‘नृत्यसंध्या’ या ओडिसी नृत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यर्कम भारतीय विद्या भवनच्या सरदार नातू सभागृहात १४ डिसेंबर २०१८ रोजी. त्याला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
पुण्यात १४ डिसेंबरला ‘नृत्यसंध्या’चे आयोजन पुणे : भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या वतीने सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत ‘नृत्यसंध्या’ या ओडिसी नृत्य कार्यक्रमाचे आयोजन १४ डिसेंबर २०१८ रोजी करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सरदार नातू सभागृहात सायंकाळी सहा वाजता होईल,’ अशी माहिती भारतीय विद्या भवनचे मानद सचिव नंदकुमार काकिर्डे यांनी दिली
शमा भाटेंच्या मुलाखतीतून उलगडला नृत्य संरचनांचा प्रवास पुणे : भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ज्येष्ठ नृत्यगुरू शमा भाटे यांची ‘कथ्थकमधील नृत्य संरचनांचा प्रवास’ (कोरिओग्राफी- काल, आज, उद्या) या विषयावर आयोजित केलेल्या प्रकट मुलाखतीला चांगला प्रतिसाद मिळाला.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language